ठाण्याच्या महापौरांसह कर्मचाऱ्यांनी गैरमार्गाने घेतली कोरोना लस

Manogat
0

भाजपा नेते आमदार अॅड आशिश शेलार यांची माहिती


देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी निकषून सांगितले होते की, फ्रंटलाईन वर्कर्सना प्रथम लस देण्यात येईल असे असताना ठाण्याचे महापौर, एक शिवसेना आमदार आणि वरळीतील इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांनी कोविड लस घेतली. अशी माहिती देऊन विधानसभेत भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी माझे सरकार म्हणून मग सरकारला माझे कसे म्हणायचे असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

महाराष्ट्रा सरकार हे आपले सरकार आहे असे प्रचार करते पण शासनाची चार खाती मंत्री किंवा अधिकारी नाही पण वेगळीच माणसे चालवत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशांत निलांबरी, उद्योग विभाग गिरीश पवार, नगर विकास विभाग अजय आशर, गृहनिर्माण विभाग किर्तीकुमार केडिया हे चालवत आहेत. या व्यक्ती कोण आहेत? तर उच्च शिक्षण मंत्री यांच्याकडे 15 ते 20 कर्मचारी कर्जाऊ घेण्यात आले आहेत. मग जर शासनाची 4 खाती बाहेरच्या व्यक्ती चालवतात एका खात्यात कर्मचारी कर्जाऊ आहेत तर एमएमआरडीए सारख्या महत्त्वाच्या प्राधिकरणावर आर. ए. राजिव यांना कंत्राटी पध्दतीने घेण्यात येणार आहे. मग हे सरकार आपले सरकार कसे? असा सवाल त्यांनी केला आहे.
 
कोरोना काळात सरकारने जे काम केले त्यावरन सरकार आपली पाट थोपटून घेतात पण या काळात खाजगी रुग्णालयांनी कसे लुटले याची उदाहरणे देऊन आशिष शेलार यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !