भाजप कार्यकर्ते गोरख दगडेंनी केली कृषि कायद्याची अंमलबजावणी

Manogat
0


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना विक्री स्वातंत्र्य देण्याकरिता कृषी कायदे आणले. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाय शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्याकरिता पर्याय उपलब्ध झाला आहे.

 
पुण्यातील बावधत मधील युवा गोरख दगडे यांनी बावधत येथे मार्केट सुरू केले आहे. कोरोनाच्या काळात परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल या मार्केटच्या माध्यमातून घरोघरी पोहचवला. किराणा रिटेल होलसेल सोबतच परिसरातील शेतकऱ्यांसाठी 10 गाळे मोफत राखुन ठेवले. शेतकऱ्यांनी आपला माल घेऊन यावा व थेट ग्राहकांना विकावा यासाठी हक्काची जागा मिळवून दिली आहे. यामुळे शेतकरी व ग्राहक यांना एका छताखाली व्यवहार करणे सुलभ झाले आहे.

गोरख दगडे, विघे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे विक्रीकरिता ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. या मंडीमध्ये शेतकऱ्यांना शौचालय व स्नानगृहाची व्यवस्था केली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !