‘राष्ट्र प्रथम’ या वृत्तीने कार्यकर्त्यांनी काम करावे : पंतप्रधान

Manogat
0


 भारतीय जनता पक्षाचे उद्दिष्ट फक्त सत्ता मिळवणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. सत्तेचा वापर जनतेच्या सेवेसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी करणे हे आपले ध्येय आहे.

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय पदाधिकार्यांकची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, ‘सबका साथ सबका विकास’ आणि सबका विश्वाीस या त्रिसुत्रीच्या आधारावर भारतीय जनता पार्टी काम करते आहे. केंद्रातील सरकारचे निर्णय या त्रिसुत्रीनुसारच घेतले जातात. जीएसटी, मालवाहतुकीसाठीचा स्वतंत्र मार्ग (स्पेशल फ्राईट कॅरिडॉर), नवे कृषी कायदे हे सर्व निर्णय या त्रिसुत्रीला डोळ्यासमोर ठेऊनच घेतले आहेत. देशात सध्या विकासाच्या दृष्टिने अत्यंत सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्र प्रथम’ हा मंत्र डोळ्यापुढे ठेवत पक्षाचे काम विस्तारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. केंद्र सरकारने घेतलेल्या कृषी कायद्यासारख्या निर्णयांची माहिती कार्यकर्त्यांनी सामान्य माणसांपर्यंत पोहचवली पाहिजे. आपल्या पक्षाचा उद्देश केवळ सत्ता प्राप्ती हा नसून सत्तेच्या माध्यमातून जनतेची सेवा करणे आणि देशाला प्रगतीपथावर नेणे हा आहे.

या बैठकीत बोलताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी ‘आत्मनिर्भर’ अभियानाचा प्रसार करण्यासाठी संकल्पबद्ध व्हावे. ‘आत्मनिर्भर’ भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्थानिक उत्पादनांचा पक्ष कार्यकर्त्यांनी प्रचार करायला हवा. स्थानिक उत्पादनांची माहिती सामान्य माणसांपर्यंत प्रभावीपणे पद्धतीने पोहोचली तर ‘आत्मनिर्भर’ अभियानाचे उद्दिष्ट साध्य करण्यास हातभार लागणार आहे. केंद्र सरकारच्या ‘स्टार्ट अप’ सारख्या योजनांची माहिती अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यापक अभियान सुरु करण्याची आवश्यकता आहे. त्याबरोबरच शेतकरी उत्पादकांच्या संस्था तयार करण्यासाठीही कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. शेतकर्यांाचे उत्पन्न वाढविण्यासाठी अशा संस्था उपयोगी ठरल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. त्यामुळे अधिकाधिक शेतकर्यांानी शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापन कराव्यात. या दृष्टिने पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे. मोदी सरकारने शेतकर्यांंचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गेल्या सहा वर्षात अनेक निर्णय घेतले आहे. या निर्णयांची माहिती शेतकर्यांकना प्रभावी पद्धतीने सांगितली तर अधिकाधिक संख्येने शेतकरी या उपक्रमात सहभागी होतील.

भारतीय जनता पार्टीकडून आता आपल्या आदिवासी बांधवांचे उत्पन्न वाढवण्या विषयीचा कार्यक्रम लवकरच हाती घेतला जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून समाजातील विविध घटकांच्या, उपेक्षितांच्या विकासासाठी सुुरु केलेल्या योजना त्या-त्या समाज घटकांपर्यंत पोहोचवणे ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. मोदी सरकारच्या विविध योजना यशस्वी ठरण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांचे त्यातील योगदान महत्वाचे ठरणार आहे. मोदी सरकारने सुरु केलेल्या योजनांचा लाभ संबंधित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून या योजना जनसामान्यांच्या कशा फायद्याच्या आहेत, ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मोदी सरकारने अलिकडेच ‘पोषण अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाची माहिती महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून जास्तीत जास्त महिलांपर्यंत कशी पोहोचवता येईल, या दृष्टिने प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोरोना कालखंडात काँगे्रसकडून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या गेल्या. जनतेमध्ये भय निर्माण करण्यासाठी या खोट्या बातम्यांचा वापर करण्याचा उद्देश काँगे्रसचा होता. मात्र काँग्रेसचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. मोदी सरकारला विरोधासाठी विरोध करायचा हे ठरवून काँगे्रसकडून नवे कृषी कायदे, जीएसटी, 370 वे कलम रद्द करणे या सारख्या विषयात विरोधाची भूमिका घेण्यात आली. कोविड लसीकरण मोहिमेबाबतही काँग्रेसने जनमानसात शंका निर्माण करण्याचा हेतूपूर्वक प्रयत्न केला.

काँग्रेस केंद्रात सत्तेत होती तेव्हा सर्व राज्य सरकारांच्या संमतीने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात मनमोहन सरकार यश आले नाही. मोदी सरकारने सर्व राज्य सरकारांची संमती मिळवूनच देशात जीएसटी लागू केल्यावर काँगे्रसने जीएसटीला विरोध केला. शेती क्षेत्रात सुधारणा करण्याचे आश्वाासन काँग्रेसने जाहीरनाम्यात दिले होते. मोदी सरकारने कृषी कायद्यातून याच सुधारणा प्रत्यक्षात आणल्या तर काँग्रेसकडून या कायद्यांना तीव्र विरोध केला जात आहे. राजकीय विरोध स्वीकारावाच लागतो. मात्र राजकीय विरोधापोटी जनमानसाची दिशाभूल करणे अत्यंत चुकीचे आहे. काँग्रेस सध्या याच मार्गावर आहे. चुकीची, खोटी माहिती समाजात पसरवून मोदी सरकार विरोधात वातावरण तयार करण्याचा अश्लााघ्य प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. या परिस्थितीत भाजपाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. काँग्रेससारख्या पक्षाकडून ज्या-ज्या विषयात खोटी माहिती पसरवली जात आहे त्या-त्या विषयातील सत्य जनतेपर्यंत नेण्याचे काम भाजपा कार्यकर्त्यांनी या पुढील काळात जोमाने करावयाचे आहे. कोविड लसीकरणासारख्या संवेदनशील विषयातही काँग्रेसने राजकारण घुसडले. या लसीबाबत जनतेच्या मनात शंका निर्माण होईल, अशा पद्धतीने काँग्रेस नेत्यांनी वक्तव्ये केली. विरोध करताना आपण किती खालची पातळी गाठतो आहे याचेही भान प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँगे्रसने ठेवलेले नाही, असे नाईलाजाने म्हणावे लागते, असेही श्री. नड्डा यांनी सांगितले.

या बैठकीत पश्चिगम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरी, आसाम या राज्यांमध्ये होणार्याष विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिने चर्चा झाली.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !