चंद्रकांतदादा पाटील यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
पुणे विधानपरिषद पदवीधर मतदार संघातील
मतदारांची यादी तयार करण्याच्या ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी दूर करा,
अशी
मागणी भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्य निवडणूक
आयोगाकडे केली आहे. या संदर्भात श्री. पाटील यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक अधिकारी
बलदेव सिंग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात श्री. पाटील यांनी म्हटले आहे
की, पदवीधर मतदारसंघाच्या मतदार ऑनलाईन नोंदणी
प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी दूर न करताच निवडणूक घेण्याची तयारी सुरू
आहे. या बाबीकडे राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष यापूर्वीच वेधण्यात आले होते. ऑनलाईन
भरलेले अर्ज नाकारले जाणे अशा अनेक तक्रारी मतदारांनी केल्या आहेत. त्याच बरोबर
सर्व्हर यंत्रणा काम करत नसल्यानेही या प्रक्रियेत अनेक अडचणी येत असल्याने ऑफलाईन
अर्ज भरण्याची परवानगी देण्यात यावी.
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती हे श्री. पाटील यांच्या समवेत उपस्थित होते.
