5000 खाटांचे हॉस्पिटल “मॅचफिक्सिंग - लॅण्ड फिक्सिंग” घोटाळा : किरीट सोमैय्या

Manogat
0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत, कोविड टास्क फोर्सची 20 जुलै रोजी बैठक झाली. या बैठकीत अन्य विषयांबरोबर मुंबईत 5000 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा विषयही चर्चिला गेला होता. अनेक गोष्टी तातडीने निर्णय घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठाकरे सरकारने या विषयाबाबत 'आश्चर्यकारक गती व कार्यक्षमता' दाखवली. 27 जुलै रोजी मुंबई महापालिका आयुक्तांनी या रुग्णालयासाठी जमीन संपादन करण्याचे निर्देश दिले.

 

30 जुलै रोजी मुंबई महापालिकेने 5000 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी खाजगी जागा हवी आहे, अशी जाहिरातही दिली.

 

25 ऑगस्ट रोजी यासाठी 2 कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले होते. यापैकी एक प्रस्ताव मुलुंडच्या जागेचा स्वास कन्स्ट्रक्शनचा तर दुसरा प्रस्ताव दिलीप शहा यांचा भांडूपच्या जागेचा होता. या प्रस्तावांची पाहणी केली तर असे दिसते की, दिलीप शहा यांचा प्रस्ताव 'बोगस' होता. कारण जी जागा त्यांनी दाखविली होती, ती जागा त्यांच्या मालकीची नव्हती, योग्य नव्हती.  महापालिका, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट म्हंटले आहे की, भांडूपच्या जागेचा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही, रद्द आहे.  दोन प्रस्ताव आले, त्यातून एक निवडला, हे कागदोपत्री दाखविण्यासाठी हा खेळ केला गेला, मॅचफिक्सिंग होते. 

 

या 22 एकर जागेची किंमत रु. 2000 ते 3000 हजार कोटी एवढी होणार.

मुंबई महापालिकेने या रुग्णालयासाठी सर्व रिपोर्ट तयार केले, आर्किटेक्टचे डिझाइन तयार केले गेले. या रुग्णालयासाठी रु.10 हजार कोटी खर्च येईल असा प्रस्ताव तयार केला गेला.

 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सर्व गोष्टींची पूर्तता 2 महिन्यात झाली.

पालिका, राज्य सरकारच्या 9 जणांच्या समितीने शिफारस केलेली ही जागा मुळातच वादात आहे.

 

स्वास कन्स्ट्रक्शनच्या मालकाने जमिनीच्या लीजधारकाच्या वतीने 8 ऑक्टोबर, रोजी                  रु. 61,65,79,003 इतकी रक्कम भरून जागेचा ताबा घेतला. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार या जागेचा ताबा 8 ऑक्टोबर, 2020 रोजी स्वास कन्स्ट्रक्शनच्या हातात आला.  ही जागा मुळात सरकारची आहे. लीज/भाडे कराराने श्री. वैती परिवाराला देण्यात आली होती. वैती कुटुंबियांनी याचे सब लीज/पोटकरारावर स्वास कन्स्ट्रक्शनला दिली असे दाखविण्यात आले आहे. या संबंधात न्यायालयीन वादविवाद चालू होते/आहे.

 

याचा अर्थ स्पष्ट आहे, ठाकरे सरकारने आधी जागा ठरविली, बिल्डर ठरविला, संगनमत (अंडरस्टँडिंग ) केले गेले, किंमत ठरविली आणि त्यानंतर रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार केला गेला.

 

रुग्णालया सोबत या जागेवर कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा प्रस्तावही दिला गेला.

 

या जागेच्या गेल्या वर्षी तयार झालेल्या विकास आराखड्यात याचा कसलाही उल्लेख नाही.

 

ओळखीच्या बिल्डरकडून जमीन विकत घेण्यासाठी “कोविड रोगाची” भिती व रुग्णालयाची आवश्यकता असे वातावरण तयार करणे व तडकाफडकी रुग्णालय उभारणी करण्याचे निमित्त दाखवून खाजगी बिल्डरची जागा विकत घेणे म्हणजे मुंबईकरांच्या माथ्यावर 12,000 हजार कोटींचा खर्च लादला जाणार आहे. 10,000 कोटीची जागा व बांधकाम आणि चालविण्यासाठी रु. 2,000 कोटी.

 

ठाकरे सरकारचा हा 12,000 कोटींचा 5000 खाटांच्या रुग्णालयाचा, कन्व्हेशन सेंटर, जमीन घोटाळा आहे असे किरीट सोमैय्या यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !