राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये अंतर आहे. शेतकरी संकटात असताना महाआघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात टाळाटाळ चालवली आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल असे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राजकुमार चाहर यांनी सांगितले. मुंबई येथे किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
भाजपा किसान मोर्चाच्या कार्य समितीची
बैठक दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात संपन्न झाली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष
खा. राजकुमार चाहर, प्रदेश किसान मोर्चाचे
अध्यक्ष व माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे,
भाजपाचे
प्रदेश संघटन सरचिटणीस विजयराव पुराणिक, किसान
मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुधीर दिवे, मकरंद
कोरडे, वासुदेव काळे,
रोहित
चिवटे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. चाहर म्हणाले,
राज्य
सरकारने संकटग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे आवश्यक होते. शेतकऱ्यांना नुकसान
भरपाई म्हणून तात्काळ मदत घोषित करणे आवश्यक होते. त्यांनी अद्याप केंद्राकडे
प्रस्ताव ही पाठवलेला नाही.
किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. अनिल
बोंडे म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे
गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यात साधारण 115 लाख हेक्टर पिकांचे
नुकसान झालेले आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने तातडीने मदत करायला हवी होती. मात्र
मदत न करता केंद्राकडे बोट दाखवून राजकारण केले जात आहे.
भाजपा प्रदेश संघटन सरचिटणीस विजयराव
पुराणिक यांनी किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्तरावर कोणत्याही शेतकरी
हिताच्या बाबीसाठी व्यक्त होण्यास राज्यातील अथवा वरिष्ठांच्या आदेशाची वाट
पाहण्याची आवश्यकता नाही असे सांगितले.
प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस सुधीर
दिवे यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या निर्मिती बाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना
मार्गदर्शन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित
असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या तयार व्हाव्यात. यासाठी संस्थात्मक मदत प्राप्त
करण्यास भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱयांनी प्रयत्न करावेत असे आवाहन श्री.
दिवे यांनी केले.
या बैठकीत केंद्र सरकारच्या 3 नव्या कृषी
कायद्याबाबत चर्चा झाली. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या निर्मितीबाबत मार्गदर्शन
करण्यात आले.
