“मुंबई महापालिकेचा कोविड मृत्यू घोटाळा”

Manogat
0

मे 2020 मध्ये मुंबईत 7 हजार कोविड मृत्यू ? : डॉ. किरीट सोमैया

 


मुंबई महापालिका कोविडमुळे झालेले मृत्यू लपवीत आहे. मे 2019 मध्ये मुंबईत एकंदर मृत्यू 7 हजार 335 जण मृत्यू झाल्याची नोंद आहे. मे 2020 मध्ये मुंबईत 14 हजार 82 मृत्यू झाल्याची नोंद मुंबई महानगरपालिकेच्या डेथ रजिस्टर मध्ये सापडते.

 

भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी ही माहिती, माहितीच्या अधिकारात मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून प्राप्त केली.

 

मे 2020 मध्ये एकंदर 14 हजार 82  मृत्यू झाल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीतून दिसते आहे. यापैकी कोविड मुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 984 असल्याचे महापालिकेतील उपलब्ध माहितीवरून दिसते आहे. याचा अर्थ मुंबईत मे 2020 मध्ये अन्य मृत्यू 13 हजार 98 एवढे झाले. 2019 मध्ये व 2020 मधील मासिक मृत्यूचे प्रमाण पाहिले तर मुंबई शहरात कोविड वगळता अन्य कारणामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण सरासरी 7 ते 8 हजार असल्याचे दिसते आहे. 

 

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना  मे 2020 मध्ये 14 हजारापर्यंत मृत्यूची संख्या कशी वाढली असे विचारले असता या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. मे महिन्यात कडक लॉकडाऊन होता. या काळात अपघाती मृत्यू झालेले नाहीत. असे असताना मृत्यूंची संख्या एवढी कशी वाढली याचे उत्तर महापालिकेने द्यावे. 

 

ज्या भागात मे 2020 मध्ये मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली ते भाग असे ई वॉर्ड, एफ दक्षिण, एफ उत्तर, के वेस्ट, एन वॉर्ड (बेहराम पाडा, आग्रीपाडा, नागपाडा, जोगेश्वरी पश्चिम, वांद्रे पूर्व).

 

कोणत्या कारणांमुळे मृत्यूंच्या संख्येत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे याची महापालिकेने चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी केली आहे.

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !