
देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासून अनेक
पंतप्रधान आपण पाहिले, मात्र
असा एकच पंतप्रधान ज्यांच नाव नरेंद्र मोदी. ज्यांनी देशाच नेतृत्व करतांना सामान्यातील
सामान्य माणसाचं कल्याण आणि राष्ट्रहिताची जोपासना करताना कुठल्याही निर्णयाची
तडजोड केली नाही. संकटे कितीही आली तरी गरिबाच्या पोटाला चार घास कमी पडू न देणारे
आणि भारतमातेच्या रक्षणासाठी सिमारेषेवर उभ राहून सैनिकांना बळ देणारे पंतप्रधान
म्हणजे नरेंद्र मोदी. असा इतिहास भारतीय राजकारणात कधीच घडला नाही.
जगाच्या पाठीवर आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढवून भारतमाता सार्वभौम, सर्व शक्ती सामर्थ्यवान आहे हे केवळ दिखावा नाही तर दाखवून दिले. देशातील आठरा पगड जाती धर्माच्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणुन गरिबीच्या चुलीचा धुराडा बंद करुन त्यांच्या निवाऱ्याची सोय करणारे पंतप्रधान हे वर्तमान युगात गरीबांचे पंतप्रधान म्हणुन देशात ओळखले जातात. राष्ट्रहितासाठी राजकिय तडजोड न करता स्वातंत्र्या पासून खिचपत पडलेले प्रश्न त्यांनी मार्गी लावले. कोट्यावधी भारतियांचे स्वप्न साकार करतांना प्रभुरामचंद्र मंदिर उभारणिचा पाया आयोध्येत जावून भरला हि खरी उपलब्धी. 130 कोटी भारतीय नागरिकांच्या शुभेच्छा घेवून सेवा कर्मी पंतप्रधान आज सत्तरीच्या उंबरठ्यात प्रवेश करणार.
भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून अनेक
पंतप्रधान होऊन गेले. मात्र वर्तमान व्यवस्थेत असा एक पंतप्रधान,
ज्याने
अवघ्या पाच-सहा वर्षात भारत मातेचे सक्षम पणे रक्षण करत जगाच्या पाठीवर आपल्या
देशाची प्रतिमा आणि सामर्थ्य वाढून दाखवलं. राष्ट्रहिता सोबतच या देशातील गोर गरिबांच
कल्याण, शेतकरी,
कष्टकरी,
मजूर,
एवढेच
नव्हे तर सामन्यातील सामान्य माणसाचे कल्याण कसं होईल याची काळजी घेतली. जे प्रश्न
सामाजिक आणि देशाच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण ते प्रश्न काँग्रेसी
सरकारांनी केवळ मताच्या राजकारणासाठी कधीच मार्गी लावले नाही. असे प्रश्न या
खमक्या पंतप्रधानाने मार्गी लावले.

भाजपाच्या उभारणीमध्ये ज्यांचा वाटा होता. त्या
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अपेक्षित असलेली अंत्य अंत्योदय कल्पना,
खऱ्या
अर्थाने मोदींनी या देशात राबवली. यामुळे सर्वसामान्य माणूस विकासाच्या प्रक्रियेत
आला. “जहाँ हुये बलिदान ओ काश्मीर हमारा है” ही घोषणा देणाऱ्या श्यामा प्रसाद मुखर्जी
यांच्या स्वप्नातील भारताची उभारणी करताना या बहाद्दर पंतप्रधानांनी काश्मीर मधील
370 कलम रद्द केलं. एवढेच नव्हे तर असे अनेक प्रश्न जे खिचपत पडलेले होते. ते अवघ्या पाच-सहा वर्षात त्यांनी मार्गी लावले. नागरिकता
संशोधन कायदा असेल किंवा ज्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी पिढ्यानपिढ्या भारतीयांनी
लढे दिले. त्या प्रभू रामचंद्र मंदिराचा प्रश्न सोडवला. मुस्लिम बांधवांमध्ये तिहेरी तलाक पद्धत बंद करून एक चांगला समाज
कल्याणाचा निर्णय त्यांनी घेतला.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकित त्यांची
भूमिका देशातील सर्वसामान्य माणसाला आवडली.
म्हणूनच 2019 च्या निवडणुकीत बहुमताने मोदींच्या नेतृत्वाखाली देशात भारतीय जनता
पार्टीचे सरकार आलं. आणि हे सरकार आल्यानंतर अवघ्या एका वर्षात महत्त्वाचे निर्णय
त्यांनी घेतले. भारत देश सार्वभौम सत्ता, सामर्थ्यवान,
बलशाली, बनवताना या देशातील गरीब
माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि शेवटचा माणूस विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे.

देशातील गरीबाची नरेंद्र मोदी यांनी सतत काळजी
घेतली. माझ्या देशातील महिला चुलीपासून मुक्त झाल्या पाहिजेत यासाठी त्यांनी उज्ज्वला
योजनेच्या मार्फत घरोघरी गॅस दिले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरिबांना घरे दिली.
एवढच नव्हे तर रस्ते, पाणी या मूलभूत गरजा आहेत त्या मार्गी लावल्या. हे केवळ मोदी
यांचा नेतृत्वाचा चमत्कार म्हणावा लागेल, जनधन
योजनेच्या माध्यमातून गरिबाला लाभ मिळवून देण्याच काम त्यांनी केले. एवढंच नव्हे
तर शेतकऱ्यांना पेन्शन योजना चालू करणारा एकमेव पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव पुढे
येतं. हे सारं करताना त्यांनी दूरदृष्टी ठेवून सतत कल्याणकारी योजना हाती घेतल्या.
या देशात कोरोना सारखं मानवी संकट आलं. या
संकटाचा सामना करताना संपूर्ण देशात ज्या प्रकारच्या उपाययोजना मोदिजींनी हाती
घेतल्या. त्यामुळे किमान जीवित हानीचा मृत्युदर वाढला नाही. वेळीच संपूर्ण देश लॉक
डाऊन केला. अशा वेळेस माझ्या देशातील गरिबाला पोटासाठी चार घास मिळाले पाहिजेत यासाठी
पंतप्रधान अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत गोरगरिबांना तांदूळ, गहू,
चणा
डाळ, तूर डाळ यासारखे धान्य पटाप
केले जाते. कोरोना संकटाचा प्रभाव वाढत असल्याने थेट दिवाळीपर्यंत देशातील 80 कोटी
मायबाप जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय मोदिजींनी घेतला आहे. गोरगरिबांच्या
प्रश्नावर सर्वसामान्य जनतेच्या कुठल्याही प्रकारची तडजोड न करता सक्षम निर्णय
घेणारे पंतप्रधान म्हणून ते पुढे येत आहेत.
कोरोना संकट सुरु झाल्यानंतर त्यांनी आरोग्याच्या
प्रश्नावर आपल्या देशात क्रांती केली. संकटात देशातील सर्व राज्यांना मोठ्या
प्रमाणावर आर्थिक मदत देण्याचे काम सुरू केले. पूर्वी आपल्या देशात एकही कोविड
रुग्णालय नव्हते. मात्र अवघ्या चार महिन्यात 1000 रुग्णालय उभारणीचं काम त्यांनी
करून दाखवलं. पिपई कीट नव्हत्या, वेंटिलेटर
नव्हते, मास्क नव्हते हे सर्व तातडीने खरेदी केले. एवढेच नव्हे तर उत्पादन कारखाने
चालू केले. आत्मनिर्भर योजनेअंतर्गत आपल्या देशामध्ये एक चमत्कार त्यांनी करून दाखवला. उत्पादण
कारखाने चालू केले. आरोग्याचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य साहित्य
आपल्या देशात तयार करून दाखवलं. सांगायचं तात्पर्य जेव्हा राजाला आपल्या देशातील
गोर गरीबाचा हित दिसतं. त्यांचं कल्याण दिसतं तेव्हा तो राजा कल्याणकारी असतो.
सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस राबराब राबतो. असंच काही पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आज जगाच्या पाठीवर भारताचा आदर्श आरोग्याच्या
प्रश्नावर इतर राष्ट्र घेत आहेत. पूर्वी आम्ही ऐकून होतो, ऊठसूट इतर देशाकडे हात
पसरायचं. पण आज अमेरिका, रशिया,
चीन
यासारखे देश भारत मातेच्या दारात येतात. आपल्या देशाकडे हात पसरतात,
मदत
मागतात. हा दैवी चमत्कार भारतीय भूमीवर कधीच घडला नाही. तो अवघ्या पाच वर्षात नरेंद्र मोदी यांच्या
सामर्थ्याने शक्तिवान नेतृत्वामुळे घडला. भारतीयांच्या मनातले स्वप्न साकार करताना
प्रभू रामचंद्र मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. तेव्हा
कोट्यावधी देशवासीयांचा हिंदू बांधवांच स्वप्न साकार झालं. आज आपल्या लाडक्या
पंतप्रधानाचा वाढदिवस आहे. त्यांनी अंगीकृत केलेला सेवाभाव मनी ठेवून लिखाणाच्या
माध्यमातून प्रगट करण्याचा केलेला छोटासा प्रयत्न त्यांना शुभेच्छा ठरतील.
-राम कुलकर्णी, भाजपा राज्य प्रवक्ता