ऑनलाईन बदल्यांच्या पोर्टलवर रिक्त पदे दिसावीत - निरंजन डावखरे

Manogat
0



जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत पोर्टलवर रिक्त पदे दिसण्याबरोबरच याच पदांवर बदल्या करण्याची कार्यवाही करावी. तसेच अवघड क्षेत्र ठरविण्याचे नियम शासननिर्णयात स्पष्ट करावेत, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ. निरंजन डावखरे यांनी केली.
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या जिल्हांतर्गत व आंतर जिल्हा बदलीसंदर्भात अभ्यासगटाच्या कोकण भवन येथे झालेल्या बैठकीत आ. निरंजन डावखरे यांनी ही मागणी केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अभ्यासगटाचे प्रमुख आयुष प्रसाद होते.

बदल्यांमधील गोंधळ टाळण्यासाठी टिचर लॉगईनवरुन भरलेल्या फॉर्मचे स्कूल लॉग इन, क्लस्टर लॉगइन व बीईओ लॉगइन अशा तिन्ही लॉगइनवर करणे बंधनकारक करावे, अवघड क्षेत्रातील शिक्षकांचा संवर्ग २ मध्ये समावेश करावा, सध्याच्या संवर्ग १ मधील उपघटकांची संख्या कमी करावी, पती-पत्नी एकत्रीकरणासाठी वर्ग ४ निर्माण करावा. एकदा एकत्रीकरण झाल्यानंतर ठराविक काळ त्यांना स्थैर्य द्यावे, धोरण बदलणार असेल तर विस्थापित शिक्षकांना प्रथम प्राधान्य द्यावे, आदी मागण्या आ. डावखरे यांनी आयुष प्रसाद यांच्याकडे केल्या.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !