महाआघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा व ७/१२ कोरा करावा यासाठी मोर्चाचे आयोजन
करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्र्वासनाप्रमाणे
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हे. २५ हजार नुकसानभरपाई मिळावी यासाठी भाजपा
प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे मोर्चा
काढण्यात आला.
यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा
पाटील,
प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, समरजीत घाटगे,
धनंजय महाडिक, महेश जाधव आदी उपस्थित होते.
