भाजपा द्वेषापायी, मुंबईकरांना का खड्ड्यात घालताय?

Manogat
0

 


"मेट्रो मार्गाचे काम चालू राहीलपण कारशेडचे काम थांबवण्यात आले आहे"असे तुम्ही जाहीर केलेतपण मेट्रो मार्ग आणि कार शेडहा एकच इंटिग्रेटेड प्रोजेक्ट आहेहे तुम्हाला माहिती नाही कायकार शेड शिवायनुसता मार्ग तयार करून काय साधणार आहे?

मेट्रो प्रकल्पाचा एकेका तासाचा खर्च कित्येक कोटी रुपये असतानाटनेलिंगसह सर्व कामे अर्धवट अवस्थेत पोचलेली असतानाहा प्रोजेक्ट थांबवूनतुम्ही नुसते हजारो कोटी रुपये वाया घालवत नाही आहाततर हा प्रोजेक्ट रिव्हाईव करतानात्याची कॉस्ट काही पटीत वाढणार असल्यानेआमच्याच खिश्यांवर कररुपी बोजा वाढवून ठेवणार आहात... कामे अर्धवट राहिल्याने वाहतुकीचा लाँगटर्म बोजवारा उडणार आहेतो वेगळाच.

आधीच्या सरकारने चालू केलेले डेव्हलपमेंट प्रोजेक्ट थांबवलेततर महाराष्ट्रात पैसे गुंतवायला गुंतवणूकदार कुठून मिळणारहा विचार तुम्ही करू शकत नाही?

सत्ता लालसेने आणि वैयक्तिक आकसापोटीआधीच तुम्ही भाजपा बरोबर केलेली निवडणूकपूर्व आणि नैसर्गिक युती तोडूनअनैसर्गिक मित्रांची सोबत केली आहेतत्यातून तुम्ही मुंबईकरांच्या हालअपेष्टांमधे भरच घालणार असालआणि वाढलेला खर्च भागवण्यासाठी जनसामान्यांचे खिसे कापणार असालतर मुंबईकर तुम्हाला पुढच्या निवडणुकीत तुमची जागा दाखवून देतीलहे नक्की.

डेव्हलपमेंट प्रोजेक्ट थांबवल्याचे संपूर्ण पापतुमचे नवीन मित्र तुमच्यावर ढकलणार आहेतआणि स्वतः नामानिराळे रहाणार आहेत... तुमचा पक्ष नामशेष झालातर त्यांना काहीच फरक पडणार नाहीयेइन फॅक्ट त्यांना आनंदच होणार आहे... तुमचे डोळे लवकर उघडावेतह्यासाठी शुभेच्छा!

- शरद केळकर


Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !