भारतीय जनता
पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सध्याचा काळ आत्मबळाची परीक्षा पहावयास
लावणारा आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला
स्वबळावर निर्विवाद बहुमत मिळाले. असे असताना मित्रपक्षाने केलेल्या दगाबाजीमुळे
आपल्याला सत्तेपासून वंचित राहावे लागले. या घडामोडींमुळे आपल्या
कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य येणे स्वाभाविक म्हणावे लागेल. सत्तेच्या
सारीपाटामध्ये असे चढउतार येत राहणारच. आता या क्षणी झाले गेले विसरून पक्षाचा
पाया आणखी मजबूत करण्यासाठी आपण कार्यरत व्हायला हवे. या पुढील काळात भारतीय जनता
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निराशा झटकून पक्ष बांधणीसाठी जे कार्यक्रम संघटनेकडून
दिले जातील त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतःला झोकून द्यायला हवे.
सत्ता आज आहे तर
उद्या नाही,
मात्र जनसामान्यांची सेवा करण्याचे व्रत आपण कायम पाळायला हवे. झालेल्या
घडामोडींबाबत पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत नेमकेपणाने पोहचवता यावी यासाठी आपण
प्रयत्नशील राहावे. सत्तेच्या नावाखाली आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा मित्रपक्षाचा
मनसुबा पक्षाच्या नेतृत्वाने ठाम भूमिका घेत उधळून लावला. या घडामोडीतून आपल्याला
कार्यकर्ता म्हणून बरेच शिकायला मिळणार आहे. या
घडामोडीत पक्ष नेतृत्वाने जे काही निर्णय घेतले त्याबाबत कार्यकर्ता म्हणून आपल्या
मनात अनेक प्रश्न येणे शक्य आहे. पक्ष नेतृत्वाने घेतलेले निर्णय अत्यंत योग्य
आहेत याची खात्री बाळगा. पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात अनेक वावड्या समाज
माध्यमांवरून उडविल्या जात आहेत, याकडे अजिबात लक्ष देऊ नका.
