नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात आंदोलन
करतांना आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज केले.
लखनऊ येथे अटलबिहारी वाजपेयी विद्यापीठाच्या भूमीपूजन
कार्यक्रमात बोलतांना श्री. मोदी यांनी आवाहन केले. ते म्हणाले की नागरिकांना
सरकार रस्ते, सार्वजनिक वाहतूक या सारख्या वेगवेगळ्या सुविधा प्रचंड खर्च करून
उपलब्ध करून देत असते. या सुविधांचे रक्षण करणे ही नागरिक म्हणून देशातील
प्रत्येकाची जबाबदारी आहे. सरकारकडे देशाचे नागरिक म्हणून आपण हक्काने बरेच काही
मागत असतो. मात्र नागरिकांनी हक्कांबरोबरच आपल्या कर्तव्याची आणि जबाबदाऱ्यांची
जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आपण हिंसाचार करून नेमके काय मिळवले याचा विचार
प्रत्येकाने करावा. असेही पंतप्रधान म्हणाले.
