विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवे महाराष्ट्र
विकासआघाडीचे सरकार आले. विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली.
राजकीय सत्तासंघर्षानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली मुलाखत 'झी २४ तास'चे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी
घेतली. या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी सर्व बाबींवर भाष्य केले.
आधीच्या सरकारच्या निर्णयाचा फेरआढावा
घेण्याचा त्यांना अधिकार आहे. तो सरकारचा अधिकार आहे. तो त्यांनी घ्यावा. मात्र, जे विकासासाठी निर्णय घेतले आहेत. ते जर रद्द केले तर अनेक बाबींवर याचा
थेट परिणाम होणार आहे. ते तसे काही करणार नाही, याची मला
खात्री आहे. मात्र, सध्या जे चित्र उभे केले जात आहे,
ते चुकीचे आहे. आज राज्याला अर्धा टक्क्यांनी कर्ज मिळाले आहे.
एवढ्या कमी किमतीत कर्ज मिळणार आहे का? त्यामुळे एखादा
प्रकल्प रद्द करणे म्हणजे मागे घेवून जाणे होय. आर्थिक दृष्टी मेट्रो प्रकल्प नवी
दिशा देणारा आहे. यावर अनेक छोटे-मोठे उद्योग अवलंबून आहेत. त्यामुळे ते प्रकल्प
रद्द करण्याचा निर्णय घेणार नाहीत, अशी अपेक्षा आहे, असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी २४ तास ला दिलेल्या
मुलाखतीत व्यक्त केले आहे.
राज्यात आलेले हे नवीन सरकार आहे. त्यांना मी
काही वेळ देणार आहे. मात्र, त्यानंतर जनतेच्या विरोधातील
निर्णय घेतले तर मी या सरकारला सोडणार नाही. त्यांना धारेवर धरणार आहे. माझी
आक्रमकता पहिल्या दिवशी पाहिली आहे. त्यामुळे मी या सरकारला जाब विचारणार आहे. पण
काही काळ देणार आहे, त्यानंतर त्यांना तो वेळ मिळणार नाही.
आक्रमकता हा माझा पिंड आहे. त्यामुळे धारेवर धरले जाईल, असेही श्री.फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
