- माजी मंत्री आमदार अॅड. आशिष शेलार
यांची प्रतिक्रिया
मुंबई: मानवतेच्या कायद्याला विरोध
करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे सांगतानाच माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अॅड. आशिष
शेलार यांनी काहीजण "जनपथला" घाबरुन सभागृहातून पळाले, असा राजकीय टोला ही लगावला आहे.
राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक
मंजूर झाले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह
यांचे अॅड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे. मानवतेच्या दृष्टीने मांडलेल्या या
विधेयकाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी विरोध केला त्याबद्दल त्यांचा
भाजपतर्फे आम्ही निषेध करतो असेही त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर.. पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि मा. गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन! जगभरातील हिंदूना आता भारत हे
आश्रयस्थान भाजपमुळेच झाले. काहींचा विरोध होता.. काहीजण विरोधी मतदान करुन
सभागृहात बसले..
काहीजण "जनपथला" घाबरुन
सभागृहातून पळाले..? आणि फसले! देशातील
तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क
गमावला होता, त्यांची सेना आज या देशात येणारे आणि इथे
आलेल्या हिंदुंना मतदानाचा हक्क नको, अशी भूमिका नागरिकत्व
सुधारणा विधेयकावर घेते. असेही त्यांनी म्हटले आहे.
