माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची प्रतिक्रिया
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत
सुद्धा पारित झाल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय
गृहमंत्री अमित शाहजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या
राज्यसभेतील सर्व सदस्यांचे सुद्धा मी आभार मानतो, अभिनंदन
करतो. अतिशय महत्वाचे आणि व्यापक असे हे मानवीय पाऊल इतिहासात कायमस्वरूपी कोरले
जाईल.
त्याचवेळी शिवसेनेने केवळ सत्तेसाठी जी
तडजोड केली, आपल्या मूळ विचारधारेला तिलांजली
दिली, ते पाहून दुःख झाले. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी जवळीक असलेल्या या विधेयकावर शिवसेनेने केवळ
सत्ता टिकविण्यासाठी केलेली तडजोड महाराष्ट्र आणि संपूर्ण देश कायम लक्षात ठेवेल.
