विधानपरिषदेतील भाजपच्या पक्ष प्रतोदपदी आमदार प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतोद पद हे राज्यमंत्री दर्जाचे पद आहे. पक्षातील सर्व विधानपरिषद आमदारांच नेतृत्व हे नेमणूक झालेले पक्ष प्रतोद करतात. नेमणूक झाल्यांनतर प्रतिक्रिया देताना प्रसाद लाड म्हणाले की, मी सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांची ताकद वाढविण्याच काम करेन. तसेच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. माझ्यावर दर्शविलेल्या विश्वासाबद्दल पक्षाचे व पक्ष नेतृत्वाचे आभार! आज माझी विधान परिषदेतील भाजपच्या पक्ष प्रतोद (राज्यमंत्री दर्जा) पदी नेमणूक करण्यात आली.
