वीज पुरवठा तोडण्याचे आदेश मागे
घरगुती वीज जोडणी कट करण्यात येणार नसल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले. राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सरकार विरोधातील आंदोलनाला यश आले आहे.
लॉकडाउन काळापासून थकीत असलेल्या वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीज जोडणी कट करण्याची धडक मोहीम सुरू केली होती. त्यामुळे राज्यभर आक्रोश निर्माण झाला आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीने राज्यभर आंदोलन करून वीज जोडणी कट न करण्याबाबत सरकारवर दबाव टाकला होता.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर आणि सभागृहातही जोरदार घोषणाबाजी करत वीजजोडणी कट न करण्याबाबत आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोणत्याही प्रकारची वीज कट न करण्याचे आश्वाासन सभागृहाला दिल्याने भाजपाच्या आंदोलनाला यश आले आहे.
