वीज वितरण कंपनीच्याच्या गलथान
कारभारामुळे जालना तालुक्यातील सेवली आणि परिसरातील 20 ते 22 गावांचे सर्व व्यवहार
पूर्णतः बंद झाले असून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा
लागत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून त्याठिकाणी
ट्रांसफार्मर देण्याबाबत अधिकारी कायम दुजाभाव करत असल्याची भावना व्यक्त करत
सेवली ता. जालना येथील ट्रान्सफॉर्मर मागील दोन महिन्यापासून बंद असल्याबाबत
वारंवार सांगून देखील अधिकाऱ्यांनी दाद न दिल्याने आज लोणीकर यांनी आक्रमक पवित्रा
घेतला. येत्या दोन दिवसात सेवली येथे ट्रांसफार्मर बसून सर्व
व्यवहार सुरळीत झाले पाहिजेत अन्यथा अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही अशा
स्पष्ट शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वीज वितरण कंपनीच्या
अधिकाऱ्यांना खडसावले.
जालना तालुक्यातील सेवली हे सर्वात मोठी
ग्रामपंचायत असणारे गाव असून जालना पासून साधारणतः 55 किलोमीटर अंतरावर आहे
त्यामुळे सर्वच ग्रामीण भागातील लोकांना आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी जालना या
शहराच्या ठिकाणी येता येणे शक्य नाही शेवली परिसरातील 20 ते 22 गावांचा पूर्ण
व्यवहार बाजारपेठ नाही ही सेवली या ठिकाणी असून मागील दोन महिन्यापासून बाजार
पट्टा परिसरातील ट्रान्सफार्मर बंद असल्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँक बुलढाणा
अर्बन जिल्हा मध्यवर्ती बँक अर्बन बँक यासह पतसंस्था येथील आर्थिक व्यवहार
पूर्णपणे ठप्प झाले आहे. परंतु महाविकास आघाडी
सरकारच्या काळात सरकार आणि मंत्री या सर्वसामान्यांच्या बाबीकडे लक्ष देत नसून
सत्तेच्या मस्तीत मशगुल आहेत अशी टीका देखील लोणीकर यांनी केली
जिल्हा वार्षिक नियोजन योजनेअंतर्गत
पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी वीज वितरण कंपनी साठी ट्रांसफार्मर बदलून देणे
फाईल बदलून देणे इत्यादी कामासाठी दरवर्षी दहा कोटी रुपये निधी राखीव ठेवणे आवश्यक
असून त्याद्वारे सर्वसामान्यांच्या अडचणी दूर केल्या जाऊ शकतात म्हणून मागील
पंचवार्षिक मध्ये ज्याप्रमाणे दहा कोटी रुपये वीज वितरण कंपनी साठी मंजुर केले जात
होते. अगदी तसेच दहा कोटी रुपये या वर्षी देखील जिल्हा वार्षिक नियोजन
योजनेअंतर्गत मंजूर करावेत अशी मागणी देखील लोणीकर यांनी पत्राद्वारे पालकमंत्री व
जिल्हाधिकारी यांना केली आहे
संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ
योजना ज्येष्ठ नागरिक विधवा अंध-अपंग परित्यक्ता शेतकऱ्यांचा पिक विमा पी एम किसान
योजना सरकार मार्फत मिळणारे विविध योजनेचे अनुदान केंद्र व राज्य सरकारच्या विविध
योजना साठी ऑनलाइन पद्धतीने करावयाचे अर्ज इत्यादी सर्व प्रक्रिया पूर्णपणे बंद
पडला असून सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत वारंवार सूचना करून देखील वीज वितरण
कंपनीचे अधिकारी ग्रामीण भागातील सुविधांकडे कानाडोळा करत असल्याबाबतची तक्रार
अनेक नागरिकांनी लोणीकर यांच्याकडे केली होती त्यावर लोणीकर यांनी आक्रमक पवित्रा
घेत अधिकाऱ्यांना खडसावले आहे.