
राज्य विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण
दरेकर यांनी पाच दिवसाचा मराठवाडा दौरा केला. तो कशासाठी होता हे वेगळ सांगण्याची
गरज नाही. कारण पाच दिवसात पाच जिल्हे पादांकांत करुन त्यांनी संकटात सापडलेल्या
शेतकऱ्यांच्या बांधावर जावून दिलासा दिला. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याची भेट घेवून
पस्थीतीतीवर चर्चा केली. बीडच्या जिल्हाधिकाऱ्या सोबत चर्चा करतांना सोबत असल्याने
दरेकर कोण ? हे कळाले. दरेकर म्हणजे शेती नसलेल्या मोठ्या
शहराचे अर्थात मुंबईचे भुमीपुत्र. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न,
झालेले नुकसान आणि शासनाची आर्थिक मदत याचे संपूर्ण ज्ञान त्यांना आहे. पिक
कर्जापासून पिक विमा आणि झालेले नुकसान याबाबत प्रशासना सोबत केलेली चर्चा
अनुभवल्यानंतर दरेकरांच्या दौऱ्याचे फलित शेतकऱ्यांना मिळाल्या शिवाय राहणार नाही.
प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते आहेत, मात्र कुठलाही वेगळा अहंभाव त्यांच्या स्वभावात दिसला नाही. नेता,
पद, आणि रुबाब या गोष्टी बाजूला ठेवून प्रवीण
दरेकर यांच्यातला कार्यकर्ता अनुभवता आला. पाच दिवस त्यांनी मराठवाड्यात
अतिवृष्टीने झालेलं नुकसान पाहणी दौरा केला. औरंगाबाद-जालना हिंगोली परभणी आणि
शेवटी बीड जिल्ह्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेलं नुकसान त्याची
प्रत्यक्ष पाहणी करताना, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नव्हे तर
चिखलात जाऊन पीक परिस्थिती अनुभवली. ज्या ठिकाणी जाता येत नव्हते तिथे बैलगाडीने
प्रवास केला. विशेष म्हणजे रात्री-अपरात्री दिवसभर जेवढ शेतकऱ्यांना भेटता येईल तो
प्रयत्न त्यांनी केला. नाही म्हटलं तरी पाच दिवसात मराठवाड्यातल्या पाच हजार
पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचं नुकसान जाणून घेतलं. वास्तविक
पाहता दौऱ्यात शेतकऱ्यांचा पुत्र, जस त्याला गोरगरीब
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असते? हे त्यांच्या स्वभावात
जाणवलं. खरंतर मुंबईतल्या लोकांना शेतीची माहिती असणार कशी? कारण
मुंबईत काळ्या मातीचा सुगंध नाही. अर्थात शेती नाही मग या लोकांना ज्ञान कुठून येतं? असं म्हणत
असताना दरेकर पट्टीचे शेतकरी पुत्र निश्चित वाटले. कारण अडचणीत सापडलेल्या
शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करता येईल. या सुचनाही त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात
प्रशासनाला केल्या.

सोयाबीन, तुर, कपास, बाजरी यासारखी पिके
मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाने नेस्तनाबूत झाली आणि शेतकरी उध्वस्त झाला.
त्यांनी स्वतः पाहिलं दौऱ्यात एका शेतकऱ्याच्या पत्नीने केवळ तीस हजार रुपयांसाठी
गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं होतं. हे लक्षात येताच दरेकर यांनी महिलेच्या डोळ्यातले
अश्रू पाहताच रोख 30 हजार रुपये दिले. अर्थात
हे सांगणे कशासाठी? असा परोपकारी नेता खऱ्या अर्थाने जनतेचा
कैवारी होऊ शकतो? रस्त्यात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी
आत्महत्या केली त्यांच्याही घरी भेट दिली.
विशेष म्हणजे पिक कर्जावरून बँका आणि
शेतकरी यांच्यात फार मोठा तणाव सध्या सुरू आहे. परभणी दौऱ्यावर असताना प्रवीण
दरेकर शेलू मधील एका भारतीय स्टेट बँकेत गेले. चक्क त्यांनी दीड तास रांगेत बसून
शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेतलं. एक कर्ज मागणी अर्ज भरतांना बँकेची कशाप्रकारे
दमछाक होती? याचं प्रॅक्टिकल पाहिलं याचा अर्थ बँक
कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी लक्षात घेतले. बीड
जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर त्यांनी या जिल्ह्यातील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना
सोबत घेतलं. या ठिकाणी त्यांचं संघटन कौशल्य जाणवलं, तालुकाध्यक्ष
कोण आहे? जिल्हाध्यक्ष कोण आहे? सर्व पदाधिकाऱ्यांची अगोदर
ओळख करून घेतली. बीड जिल्ह्यात तीन तालुक्यात पाहणी केली. सुरुवातीला त्यांनी
पक्षाच्या जिल्हा कार्यालयात भेट दिली नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत सविस्तर
चर्चा केली. प्रशासना कडून सर्व माहिती घेतल्यानंतर काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या
याच स्वागत जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केलं. अर्थात प्रशासनाची बाजू समजून
घेऊन त्यांच्या कानावर जनतेचे प्रश्न टाकून मग प्रशासन सरकारकडे बाजू मांडून
प्रश्न मार्गी लावणारा हा नेता अनुभवता आला. शेतकर्यांना आर्थिक मदत तात्काळ कशी
मिळेल याच्या सूचना त्यांनी प्रत्येक जिल्हा प्रशासनाला दिल्या. सांगायचं तात्पर्य
हेच आहे की प्रवीण दरेकर यांच्यातला संघटनात्मक कौशल्य आणि प्रशासन हाताळण्याची
हातोटी की खरंच जनतेला न्याय देणारे असून, सरळ साध्या व्यक्तिमत्वाने
ज्यांनी एका दौर्यात मराठवाडा लोकांची मने जिंकली.
- राम कुलकर्णी
राज्य प्रवक्ता बीड