
शेतकऱ्यांच्या बाजूने केंद्र सरकारने
केलेल्या कायद्याला विरोधक उसने आवसान आणत, विरोध
करत असले तरी शेतकरी राजा मात्र कायद्याच स्वागत करत आहे, हा
कायदा केल्यामुळे जिल्ह्याचा खासदारांचा सत्कार शेतकऱ्यांनी केला, हा कायदा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळवून देणारा आहे. उत्पादीत
केलेला शेतीमाल याचा शेतकरी अखेर पर्यंत मालक असून दलालांची दुकानदारी बंद झाली असे
प्रतिपादन खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केले.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करण्यासाठी खासदार राडी दैठणा परिसरात मागच्या
आठवड्यात आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत शेतकरी विधेयक पास
करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढवली. त्याबद्दल शेतकरी बांधवांमध्ये
कमालीचा आनंद आणि उत्साह आहे. भाजप लोकप्रतिनिधी रस्त्यावर दिसले की ठिक-ठिकाणी
त्यांचा सत्कार राज्यभरात होत आहे. प्रीतमताई म्हणाल्या की,शेतकऱ्यांच्या हितासाठी
निर्णय घेणारे देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव नेतृत्व आहे. देशाला
स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे जरी झाले तरी
शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. त्यांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट आता
खऱ्या अर्थाने उगवली. जे लोक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताच्या आड येत होते आणि दलाली
करुन आपली दुकानदारी चालवत होते त्यांची दुकानदारी या नव्या कायद्याने बंद होईल.
शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व प्रतिष्ठा वाढेल या शब्दात प्रीतमताई यांनी नवीन
कायद्याचे समर्थन केलं.
यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ
चाटे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युतराव गंगणे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने
उपस्थित होते. देशात आणि राज्यात विरोधाला विरोध म्हणून काँग्रेस व डाव्या
विचाराचे लोक पुढे येत असले तरी शेतकऱ्यांच्या फडात बळीराजा या निर्णयाचे जोरदार
स्वागत करत आहे.