उत्पादकांना पिक विम्याची नुकसान भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद

हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन
2019-20 अंतर्गत केळी पिकांची 12 टक्के दराने विलंब शुल्कासहित नुकसान भरपाई रक्कम
तातडीने शेतकऱ्यांना द्यावी या करीता खा. उन्मेशदादा पाटील यांनी कृषी आयुक्ताकडे
पत्राद्वारे मागणी केली होती. या अनुषंगाने कृषी विभागाच्या माध्यमातून तातडीने
आदेश होवून कार्यवाही झाल्याने जिल्हाभरात 41379 शेतकऱ्यांना एकूण 287 कोटी 58 लाख
रुपयांची रक्कम टप्याटप्याने वितरित केली जाणार आहे. त्यापैकी हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्री. पाटील यांच्या खंबीर पाठपुराव्यामुळे
ही रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यानी ‘सोशल मीडिया’वर खा. उन्मेशदादा पाटील यांच्यावर
अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन
2019 - 20 मध्ये जळगाव जिल्ह्यातील केळी पिकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या
अंदाजित 42,179 असून त्यांचे 54,124 हेक्टर क्षेत्र संरक्षित केलेले असून विमा
हप्त्याच्या शेतकरी हिश्याची रक्कम अंदाजीत 34 कोटी 29 लक्ष भरलेली असताना शासन निर्णयानुसार लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान
भरपाईची रक्कम विमा कालावधी संपुष्टात आल्यानंतर ४५ दिवसात किंवा महाराष्ट्र शासनाने त्यांच्या हिश्याची
विमा हप्ता रक्कम दिल्याच्या ३ आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे
बंधनकारक असल्याचे नमूद केले असताना अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली
नव्हती. तातडीने नुकसान भरपाई मिळवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी श्री.
पाटील यांनी कृषी आयुक्तांकडे मागणी केली होती. याबाबत श्री. पाटील यांनी एक खरमरीत पत्र लिहून ही भरपाई देण्यात यावी
अशी जोरदार मागणी केली होती.
विमा कालावधी दिनाक ३१ जुलै २०२० रोजी
पूर्ण झालेला असून आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांच्या खात्यात सदरील रक्कम जमा
झालेली नाही. तसेच महाराष्ट्र शासनाने 3 ऑगस्ट 2020 च्या शासन निर्णयानुसार
राज्याच्या हिश्याची विमा रक्कम जमा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेला असून
प्रत्यक्षात माहिती घेतली असता सदरील रक्कम संबंधित विमा कंपनीच्या खात्यात दिनांक
10 सप्टेंबर 2020 रोजी जमा झाले असल्याचे समजते. वरील प्रमाणे विमा कालावधी संपून
४५ दिवस तसेच राज्य शासनाने विमा हिश्याची रक्कम भरून ३ आठवडे पूर्ण झाले असून
आजतागायात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. संदर्भीय शासन निर्णयात विमा कंपनीच्या भूमिका
व जबाबदाऱ्या मधील मुद्दा क्रमांक 21 अन्वये
कंपनीने विमा रक्कम देण्यास केलेल्या विलंबामुळे सर्व शेतकऱ्यांना १२ टक्के
दराने विलंब शुल्कासहित नुकसानभरपाईची
रक्कम तात्काळ मिळावी अशी आग्रही मागणी श्री.
पाटील यांनी केल्याने कृषी विभागाच्या माध्यमातून तातडीने आदेश होवून कार्यवाही
झाल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
पसरले आहे.