
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सरदार
तारासिंह यांच्या निधनाने पक्षाने सेवाभावी वृत्तीचा नेता गमावला आहे,
अशी
आदरांजली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी अर्पण केली.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की,
सरदार
तारासिंह हे भाजपाचे समर्पित नेते होते. ते सेवाभावी वृत्तीचे होते. 1984 ते 1999
या काळात ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक होते तर 1999 ते 2019 या काळात ते चार वेळा
विधानसभेचे आमदार झाले. लोकप्रतिनिधी म्हणून आणि भाजपाचा कार्यकर्ता म्हणून
त्यांनी सदैव समाजाच्या सेवेला वाहून घेतले होते. मुलुंड परिसरात त्यांनी रस्ते,
पिण्याचे
पाणी, वीज पुरवठा,
उद्याने,
बस
थांबे अशा विविध सुविधा पुढाकार घेऊन निर्माण केल्या. त्यांनी गरीबांसाठी रोजचे
अन्नछत्र चालविले होते. तख्त सचखंड श्री. हजूर अबचल नगर साहिब नांदेड गुरुद्वाराचे
अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी कार्य केले होते. भारतीय जनता पार्टी,
महाराष्ट्रतर्फे
आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात पक्ष सहभागी
आहे.