कोरोना रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन देण्यात येणाऱ्या मशीनचे उद्घाटन

Manogat
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त आ. सुधीरदादा गाडगीळ आणि अंजली फौंडेशनचा उपक्रम

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त आ. सुधीरदादा गाडगीळ आणि अंजली फौंडेशन तर्फे कोरोना रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन देण्यात येणाऱ्या मशीनचे उद्घाटन श्री. गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.

 

सध्याच्या कोरोना साथीच्या काळामध्ये ज्या रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव घरीच उपचार घ्यावे लागत आहेत अशा रुग्णांसाठी हे ऑक्सिजन मशीन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. वेळीच ऑक्सिजन मिळाल्यामुळे रुग्णाचे प्राण वाचण्यास मोलाची मदत होणार आहे. आ. सुधीरदादा गाडगीळ आणि अंजली फौंडेशन तर्फे आमदार जनसंपर्क कार्यालयातून आवश्यकतेनुसार ऑक्सिजन मशीनचा पुरवठा करण्यात येणार आहे. सदरचे मशीन वापरून झाल्यानंतर संबंधितांनी मशीन परत करावयाचे आहे. अंजली फौंडेशनतर्फे सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खाजगी दवाखाने व कोव्हीड रुग्णालयावरचा ताण कमी करण्यासाठी तसेच भयग्रस्त मनावरील ताण कमी होण्यासाठी या मशीनचा उपयोग होणार आहे.

 

सदरचे मशीन डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरायचे आहे. अशा मशीनची सर्वांसाठी गरज आहे. रुग्णाला प्रथम पल्स ओक्सिमिटर लावून त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासायची आहे. आवश्यकता वाटली तरच हे मशीन वापरात आणावयाचे आहे. मशीन लावल्यानंतरही त्या रुग्णाचा ऑक्सिजन रेट ९५ च्या वर जात नसेल तर त्याला रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करावे. या मशीनची क्षमता प्रति मिनिट ७ लिटर अशी आहे. संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. संतोष पाटील यांनी या मशीनचे प्रात्यक्षिक दाखविले. इच्छुकांनी ऑक्सिजन मशीनसाठी विश्रामबाग येथील आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी ०२३३-२३०४४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 

यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाशतात्या बिरजे, माजी आमदार नितीन शिंदे, महापौर गीताताई सुतार, सभागृह नेते युवराज बावडेकर, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, नगरसेवक संजय कुलकर्णी, सुब्राव मद्रासी, सभापती उर्मिला बेलवलकर, नसीमा नाईक, नगरसेविका सविता मदने, अप्सरा वायदंडे, गीतांजली ढोपे-पाटील, अपर्णा कदम यांच्यासह  युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक माने,  विश्वजीत पाटील, सुजित राऊत, अतुल माने, मकरंद म्हामुलकर, दरीबा बंडगर, धनेश कातगडे, गणपती साळुंखे, उदय बेलवलकर, गौस पठाण, गणेश कांबळे, प्रथमेश वैद्य, चेतन माडगूळकर, शांतीनाथ कर्वे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !