
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपा
महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी राज्यातील
आरोग्य क्षेत्रातील व वैद्यकीय क्षेत्रातील बिघडलेल्या विविध समस्यांबाबत निवेदन
दिले व सविस्तर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात भाजप वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र
प्रदेश संयोजक डॉ. अजीत गोपछडे, डॉ. स्मिता रणजित काळे संयोजक
मुंबई भाजप वैद्यकीय आघाडी, डॉ. राहुल कुलकर्णी संयोजक ठाणे-कल्याण, डॉ. मनिषा माने, डॉ. क्रिष्णा वोरा, डॉ. सचिन बंडगर, डॉ. श्याम पोटदुखे यांचा समावेश
होता.
यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी
डॉक्टर्स,
डेंटिस्ट पॅरामेडीकल, फार्मसिस्ट, टेक्निशियन, रेडिओग्राफर, परिचारिका
व आरोग्य सेवक यांच्या दयनीय अवस्थेबाबत व कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणे बाबत भाजपा
महाराष्ट्र प्रदेश वैद्यकिय आघाडीने सविस्तर निवेदन दिले.
यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या
सोबत खालील मुद्द्यांवर विचारविनिमय व चर्चा झाली.
१)डॉक्टर्स , पॅरामेडीकल,डेण्टिस्ट पारीचारीका फार्मसिस्ट, टेक्निशियन,रेडिओग्राफर, व आरोग्य सेवक यांच्यावर होणारे हल्ले.
२)महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व पारीचारीकांची
कोविड सेंटर मधील असुरक्षितता.
३)मृत पावलेल्या खाजगी रुग्णालय डॉक्टरांना 50 लाखांचे विमा संरक्षण कवच नाकारणे, ४)ऑक्सिजनची
रेशनिंग करणे, व राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यावर भर
देण्यात यावा.
५)ग्लोव्हज,मास्क,
सॅनिटाइझर, फेसशिलड व पीपीई किट आणि गरजेच्या
गोष्टींची किंमती भरमसाट वाढणे आणि त्या नियंत्रित न करणे.
६)सरकारी डॉक्टर्स,नर्सेस डेंटिस्ट, पॅरामेडीकल, फार्मसिस्ट,
टेक्निशियन, रेडिओग्राफर आणि आरोग्यसेवक यांची
कोविड साठी तातडीची भरती केली परंतु त्यांचे वेतन न देणे.
७)डॉक्टर्स,पॅरामेडीकल,
डेण्टिस्ट,नर्सेस फार्मसिस्ट,टेक्निशियन, रेडिओग्राफर आणि आरोग्य सेवक
यांच्यासाठी कोविड साठी बेड न मिळणे व त्यामुळे या कोरोना योद्धा व आरोग्यसेवकांचे
मृत्यू ओढवणे.
८)अत्यावश्यक व जीवनोपयोगी असणारे रेमडेसीविर
हे इंजेक्शन उपलब्ध नसणे आणि त्याचा काळाबाजार होणे.
वरील मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी योग्य
ती पाऊले उचलून ढासळलेली रुग्ण सेवा व महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था त्वरित
पूर्वपदावर आणण्यास भाग पाडू व जनतेचे प्राण वाचवू असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश
भाजप वैद्यकीय आघाडीतील सर्व डॉक्टर्स पदाधिकाऱी यांना दिला.