आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळालेल्यांना मोबदल्याचे वाटप

कोरोना महामारीमुळे सध्या सर्वांसमोर रोजगाराचा
प्रश्न निर्माण झाला असून, अनेकांवर
बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पण त्यातून सावरण्यासाठी कोथरुड विधानसभा
मतदारसंघाचे आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मदतीचा हात
पुढे केला असून, या उपक्रमाची
वचनपूर्ती आज कोथरुड कार्यालयात संपन्न झाली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश
लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर ज्यांचे हातावर पोट आहे,
अशांसमोर
आपल्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून या
संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी अशा होतकरु व गरजू
व्यक्तींना मदतीचा हात देण्याचे निश्चित केले होते.
यामध्ये या गरजू व्यक्तींमधील कलागुणांच्या
अनुषंगाने एक महिन्याचा रोजगार आणि त्याचा मोबदला देण्यात येणार होता. या
उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक गरजूंनी दादांच्या
कार्यालयाशी संपर्क साधला. या सर्वांचे कलागुण जाणून त्यांना योग्य तो रोजगार
मिळवून देण्याची जबाबदारी दादांनी मतदार संघाचे प्रचार आणि प्रसिद्धी प्रमुख रणजीत
हगवणे आणि पक्षाच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या उल्का मोकसदार यांच्याकडे सोपवली
होती. या दोघांनीही ही जबाबदारी लिलया सांभाळली. या दोघांनी त्यांच्या मुलाखती
घेऊन, कौशल्य गुणाच्या
अनुषंगाने रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या.
आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
वाढदिवसाचे औचित्य साधून या सर्वांना त्यांच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे आणि कोथरुड विधानसभा मतदार संघाचे प्रभारी नगरसेवक
राजेश येनपुरे, विधानसभा मतदारसंघाचे
अध्यक्ष पुनित जोशी, व्यापारी
आघाडीचे अध्यक्ष सुनिल गेहलोत, या
उपक्रमाची जबाबदारी लिलया सांभाळलेले रणजीतजी हगवणे आणि पक्षाच्या ज्येष्ठ महिला
कार्यकर्त्या उल्का मोकजदार, कार्यालय
प्रमुख राहुल देशपांडे उपस्थित होते.