अश्लिल व्हिडिओ पहात बसलेल्या 17 वर्षीय मुलाकडून 19 वर्षीय मिञाच्या मदतीने 11वर्षीय चिमुकलीवर बलात्कार!
सदर घटनेची माहिती समजताच भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी तातडीने पाबळ येथे पिडीतेच्या घरी भेट दिली. तसेच शिक्रापूर येथे पोलिस स्टेशनला अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर घटनेचा योग्य तपास करून आरोपींना कठोरातील कठोर कारवाई होईल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन उमाताईंनी केले. सदर मुलीला केंद्र सरकारच्या मनोधैर्य योजने अंतर्गत निधी मिळवून देण्यातही पोलिस प्रशासनाने कागदपत्रांची पूर्तता करून तत्परता दाखवावी असेही त्यांनी सांगितले.
महाआघाडी सरकार अतिशय निष्क्रिय असून महिला सुरक्षिततेवर भर देणाऱ्या
महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची नेमणूकदेखील अजून केलेली नाही. महिला
सुरक्षेचा गांभीर्याने विचार केला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्च्या
काढण्याचा इशाराही प्रदेशाध्यक्षांनी दिला.
