शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा : चंद्रशेखर बावनकुळे

Manogat
0

कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्याचा सर्वाधिक फटका राज्यातील शेतकऱ्यांना  बसला आहे. सहा महिन्यात राज्यात १०७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असं असूनही सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं नाही. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी माजी मंत्री व भाजपाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

 

जानेवारी ते जून या सहा महिन्यात १०७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. रोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शासनाला वारंवार विनंती करूनही सरकारने अद्याप शेतकऱ्यांची दखल घेतली नाही.

 

लॉकडाऊनमुळे फळे आणि भाजीपाला शहरातील मार्केटमध्ये पोहोचू शकले नाही. परिणामी संपूर्ण मालाची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. बाजारामध्ये फळभाज्या कवडीमोल किमतीवर आल्यामुळे  कितीतरी शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकाव लागलं. सरकारने या काळात शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करून त्यांची नुकसान भरपाई करायला हवी होती. पण सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. असे विधानही त्यांनी केले.

 

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. सकारने ५०हजार कोटींचे विशेष पॅकेज  जाहीर करावे. महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल मध्यमवर्गीय शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहावे अशी विनंती चंद्रशेखर बावकुळे यांनी यावेळी केली.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !