नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ज्या
आसाममध्ये निदर्शने झाली, त्याच आसाममध्ये आता या कायद्याच्या समर्थनार्थ
ठिकठिकाणी प्रचंड रॅली काढण्यात येत आहेत. या
कायद्याबद्दल आसामी जनतेच्या मनात निर्माण केली गेलेली भीती हळूहळू दूर होऊ लागली
आहे. त्यामुळेच या कायद्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी आसाममध्ये नागरिक मोठ्या
संख्येने एकत्र येत आहेत. आसाम मधील मोरीगाव जिल्ह्यातील जागीरोड येथे शुक्रवारी
झालेल्या प्रचंड मेळाव्याला आसामचे उपमुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी संबोधित
केले.



