जम्मू-काश्मीरमधील खातीजा परवीन या पाकिस्तानी
मुस्लिम विवाहितेला नुकतेच भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले. पूंछच्या
जिल्हाधिकार्यांनी परवीनला या संबंधिची शासकीय कागदपत्रे सुपुर्द केली. खातिजा
परवीन यांचा पूंछ येथील मोहम्मद ताज यांच्यांशी विवाह झाला आहे. विवाहानंतर परवीन
यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार
नागरिकत्व कायदा 1955 च्या कलम 5 (1)(क) नुसार भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी राहुल यादव यांनी परवीन यांना नागरिकत्व
प्रमाणपत्र प्रदान केले. आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळाल्याबद्दल परवीन यांनी
समाधान व्यक्त केले.
नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत काँग्रेस, कम्युनिस्ट आणि अन्य शक्तीनींही समाजात धार्मिक आधारावर विभाजन घडवून
आणण्याचा प्रयत्न जोमाने सुरु केला आहे. या कायद्यामुळे भारतातील मुस्लिमांना आपले
नागरिकत्व गमवावे लागेल, यासारखी खोटी माहिती पसरवून
हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जात आहे. हा कायदा देशातील मुस्लिम नागरिकांच्या
विरोधात नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांनी वारंवार स्पष्ट केले असले तरी काही विघ्न संतोषी मंडळी
मोदी सरकारविरोधात मुस्लिम धर्मीयांची माथी भडकवण्याचा उद्योग करत आहेत. यातून आपण
राष्ट्रीय एकात्मेला धोका निर्माण करीत आहोत, याचे भानही या
मंडळींना राहिले नाही. राजकीय स्वार्थाने आंधळे झालेल्या मंडळींनी वर्षांनुवर्षे
नांदत आलेला धार्मिक सलोखा नष्ट करण्याचे ठरविले असल्याचे दिसते.
या कायद्यामुळे मुस्लिम धर्मीयांना कोणत्याही
प्रकारे त्रास दिला जाणार नाही.
