गांधी जयंतीनिमित्त भाजपा तर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Manogat
0


महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह पक्षाचे केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी ही माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी खादी प्रसारासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच स्वच्छताविषयक आणि आत्मनिर्भर संकल्पनेच्या प्रसारासाठी विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे पुणे येथील कार्यक्रमांत सहभागी होतील. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत कोथरूड ( पुणे ) येथे स्वच्छतागृहांचे सफाई अभियान, खादी दुकानांना भेट , फिरत्या वाचनालयाचे लोकार्पण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर येथे, केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी नगर येथे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे जालना येथे, राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ.आशिष शेलार हे मुंबई येथे, राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर या औरंगाबाद येथे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे हे शेगाव येथे, सुरेश हाळवणकर हे कोल्हापूर येथे, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे या नाशिक येथे, आ.सुजितसिंह ठाकूर हे उस्मानाबाद येथे, आ. रवींद्र चव्हाण हे पालघर येथे या कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. याशिवाय पक्षाचे प्रदेश स्तरावरील अनेक पदाधिकारी, खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी या कार्यक्रमांत सहभागी होतील, असे श्री. भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !