राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुंबई भाजपाचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी बुधवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा, आ. गणेश नाईक, आ. विद्या ठाकूर, आ. योगेश सागर, आ. गिरीश व्यास, आ. संजय केळकर, आ. कुमार आयलानी, आ. राहुल नार्वेकर, आ. मंगेश चव्हाण, आ. सुनील राणे, आ. तमिळ सेल्वन, आ. सुधीर गाडगीळ आणि आ. भारती लव्हेकर उपस्थित होते.

