जनतेचा विश्वास सार्थ ठरवू: कपिल पाटील

Manogat
0

भर पावसातही जन आशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद


जनतेने आपल्याला दोनदा मोठ्या विश्वासाने लोकसभेत पाठविले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली आहे. केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू असे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बुधवारी केले. जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी श्री. पाटील यांनी कल्याण, शहाड, उल्हासनगर, टिटवाळा, बदलापूर परिसरात जनतेशी संवाद साधला. भर पावसातही या यात्रेला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.

कल्याण पश्चिम मधील दुर्गाडी चौकातून सकाळी सुरू झालेली यात्रा कल्याण शहरातील सहजानंद चौक, शिवाजी चौक, डॉ. आंबेडकर उद्यान, नेताजी सुभाष चौक, सिंधी गेट मार्गे शहाड येथे पोहोचली. शहाड, मोहने गाव, बल्याणी चौक मार्गे टिटवाळा येथे यात्रा पोहोचली तेव्हा पावसाने चांगलाच जोर धरला होता. मात्र नागरिक भर पावसातही यात्रेच्या स्वागतासाठी रस्त्यावर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिटवाळा येथे श्री महागणपतीला मंदिराबाहेरूनच देशाला लवकर कोरोनामुक्त करण्याचे गाऱ्हाणे घातले गेले. त्यानंतर गोवेली, म्हारळ मार्गे यात्रा उल्हासनगर येथे आली. यात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांबरोबर संवाद साधण्यात आला. नागरिकांनी ठिकठिकाणी श्री. पाटील यांना विविध विषयाबाबतची निवेदने दिली.

आ. किसन कथोरे, आ. कुमार आयलानी, माजी आ. नरेंद्र पवार, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील आदी यात्रेत सहभागी झाले होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !