भाजपा उत्तर भारतीय मोर्चा तर्फे कोकण पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य रवाना

Manogat
0


कोकणातील पूरग्रस्तांसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उत्तर भारतीय मोर्चातर्फे १५०० कुटुंबांसाठीचे मदत साहित्य भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, आ. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी रवाना करण्यात आले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित, उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय पांडे, संतोष सिंग, ब्रिजेश सिंग आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आ. आशिष शेलार यांनी सांगितले की, कोकणातील स्थिती अत्यंत भीषण आहे. अशा काळात उत्तर भारतीय मोर्चाने आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करून आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिला आहे. उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय पांडे म्हणाले की, संकटकाळात आपल्या बांधवांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, या भावनेतून मदत साहित्य कोकणात पाठविले जात आहे. १५०० कुटुंबांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशा वस्तू, घरावर बसविण्यासाठीचे पत्रे, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आदी वस्तूंचा मदत साहित्यात समावेश आहे, असेही श्री.पांडे यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !