प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार
अभियानाचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास
दामोदरे यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत पंढरपूर
मधील साधारण शंभर फॉर्म भरून घेण्यात आले. पहिल्या व दुसर्या टप्प्यातील उषा
गायकवाड,
जब्बीन बागवान, कार्तिकी साठे, लक्ष्मी वाघमोडे, वनिता जाधव, बनकर
ताई, प्रभावती शिंदे, शोभा आवटे,
अंबिका खिलारे, सारीका कबाडे, लक्ष्मी कबाडे, प्रणिता चंदनशिवे, सुरेखा कांबळे, अंजली रणदिवे, रुक्मिणी
सावंत, पुष्पा बनकर या पथविक्रेता महिलांना प्रत्येकी दहा
हजार रुपये उद्योग सुरु करण्यासाठी मिळवून देण्यात आले.
या मिळालेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या रकमेतून पथविक्रेता महिलांनी त्यांचे फळविक्रेता, भाजीविक्रेता, मसाल्याचे पदार्थ विक्री, चुडाबांगडि विक्री, भुईमुगाच्या शेंगा विक्री असे व्यवसाय सुरू केले. प्रत्येक पथविक्रेतेच्या विक्री स्थळी प्रदेश उपाध्यक्ष देविदास दामोदरे यांनी भेट दिली. देवीदास दामोदरे यांच्या पंढरपूर बाजार पेठेतील काही लाभार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला. या योजनेचा लाभ प्रत्येक पथविक्रेत्या महिला व पुरुषांनी घ्यावा असे आवाहन देविदास दामोदरे यांनी या प्रसंगी पथविक्रेत्यांना केले.