भाजपा माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांचा आरोप

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये
एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, गेल्या
सहा महिन्यापासून बंद असलेले उद्योग-धंदे हळूहळू पुर्वपदावर येत असताना अशातच आज
सकाळपासून संपूर्ण शहर काळोखात बुडालेले आहे या परिस्थिती राज्याचे ऊर्जामंत्री
जबाबदार आहेत असा आरोप भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख व ऊर्जाखात्याचे
माजी सल्लागार संचालक ऊर्जातज्ज्ञ विश्वास पाठक यांनी केला आहे.
श्री. पाठक यांना म्हटले आहे की,
सकाळपासून मुंबईत वीज गायब आहे. यामुळे केवळ उद्योग क्षेत्राचे
नुकसान झालेले नसुन अनेक कोरोना उपचार केंद्रावरही त्याचा परिणाम झालेला आहे.
व्हेंटिलेटर असलेल्या रूग्णांचे हाल झाले आहेत, ऑनलाईन
परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांना पुन्हा एकदा त्रासाला सामोरे जावं लागत आहे. अनेक
प्रवासी हे लोकलमध्येच अडकून पडलेले आहेत. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांने 24 तास
सतर्क राहून आपली भूमिका निभावली पाहिजे. आपली यंत्रणा ही सुरळीतपणे कशी कार्यरत
राहिल यावर लक्ष असणे अत्यावश्यक असते. तेव्हा ऊर्जामंत्र्यांनी इतर राज्यात लक्ष
देण्याऐवजी आपल्या खात्याच्या कारभारावर लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, मंत्र्यांना यंत्रणेवर लक्ष देण्याऐवजी खात्यातल्या बदल्यामध्ये
मंत्र्यांना जास्त रूची आहे. आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची बदली करून घेणे,
जूनी कंत्राटे रद्द करून जवळच्या लोकांना कंत्राटं देणे, अधिकाऱ्यांवर वचक नसणे या सगळ्या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांना हा ‘काळा दिवस’ पाहावा लागत आहे.
कोरोना महामारीच्या सुरूवातीला जेव्हा
पंतप्रधान मोदी यांनी 5 जुलैला थोड्या वेळासाठी वीज बंद करण्याचे आवाहन केले होते.
तेव्हा ऊर्जामंत्र्यांनी ग्रीड पॉवर विषयी चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये गैरसमज
निर्माण केला होतो. तेव्हा तत्वज्ञान शिकवणारे मंत्री आज गप्प का असा सवाल करताना
मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी श्री. पाठक यांनी
केली आहे.