येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नव्हे

Manogat
0

देवेंद्र फडणवीस काट्या, कूपाट्या चिखल तुडवत बांधावर 


मानवी जीवावर संकट आलं कि राज्यातील जनतेच्या मदतीला धावून जाताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारा नेता अशी ओळख देवेंद्र फडणवीस यांची आहे. कोरोना संकटात कोवीड सेंटर पासून. अगदी आरोग्य यंत्रणा जिथे पोहोचत नाही तिथे  जाऊन येणारा नेता. तर मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी काट्या कूपाटया, चिखल तुडवित बांधावर जाऊन पाहणी करणारा नेता उभा डोळ्याने महाराष्ट्र पाहत आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांचे दौरे पायातील बूट चपलाला चिखल पण लागू न देता, केवळ राजकीय स्टंटबाजी म्हणून औपचारिकता होताना दिसत आहे. तर फडणवीस सारखा नेता शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्याशी संवाद साधत आहे. सत्ताधारी मदत करण्यापेक्षा केंद्राकडे बोट दाखवत आहेत, तर पाठोपाठ फडणवीस वस्तुस्थिती सांगत लोकांच्या समोर सरकारच्या नाकर्तेपणावर हल्ला चढवतात. सामान्य शेतकऱ्यांना मात्र फडणवीसांच्या आवाजातून मदतीची अपेक्षा निश्चित वाटते.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी पाच वर्षाचा अनुभव आहे. संकट काळात लोकांना मदत कशी केली पाहिजे? आणि व्यवस्थापन कसं हाताळले पाहिजे? याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे कुठल्याही संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारा नेता महाराष्ट्र पाहत आहे. कोरोना संकटात मातबर पुढारी घराबाहेर पडले नाही? मात्र फडणवीस संपूर्ण राज्यात पायात भिंगरी घालून गोरगरिबांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी फिरत होते. वर्तमान काळात राज्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, भागांमध्ये शेतकरी नेस्तनाबूत झाला, असून प्रचंड पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. वास्तविक पाहता सरकारने तात्काळ मदत करणे महत्त्वाचे आहे. पंचनाम्याचे कागदी घोडे न हाकता शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यायला हवी. सरकार मात्र त्या विचारात नाही. हे लक्षात आल्यानंतर फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे. स्वस्थ न बसता महाआघाडी सरकार नाकर्ता आहे, असंवेदनशील आहे. अशावेळी जनतेला मदत कोण करणार? म्हणून स्वतः त्यांनी या संकटात पाहणी दौरा सुरू केला. बारामती जिल्ह्यातून त्यांनी दौंड मार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. नंतर उस्मानाबाद जिल्ह्यात आले. केवळ राजकीय स्टंटबाजी त्यांना मान्य नाही? एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यात पाहणी करताना. नकाशे पाहत कार्पेटवर चालतात ? असही काल जनतेने पाहिलं. तर दुसरीकडे हा सामान्य जनतेचा आवाज म्हणून पुढे येणारा नेता, जेव्हा नुकसानीची पाहणी करत होता. तेव्हा त्यांनी शेतकऱ्याच्या केवळ बांधावर नाही तर प्रत्यक्ष काट्या चिखल तुडवित लोकांच्या सोबत संवाद साधला. ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.  येथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नव्हे. सर्वसामान्य जनता मग शेतकरी  कष्टकरी  त्यांचं दुःख जर पहायचा असेल तर प्रत्यक्ष त्यांच्या कठीण प्रसंगात जाऊन सहभागी होणे तोच खरा नेता असतो? आज दिवसभरात फडणवीसांच्या दौऱ्यातून प्रत्यक्ष ते पाहायला मिळालं.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !