महाराष्ट्रात सामान्य जनतेचे प्रश्न
आवासून उभे आहेत. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या प्रश्नापासून
डिस्टंसिंग केले आहे. असा घणाघाती आरोप आ.आशिष शेलार यांनी केला. मराठवाडा पदवीधर
मंचाकडून आयोजित "संवाद अधिवेशनापूर्वीचा- वेध मराठवाड्याच्या प्रश्नांचा"
या कार्यक्रमात आ.शेलार बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभा सदस्य
खा.डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा शहर
जिल्हाध्यक्ष संजय केनेकर, माजी महापौर बापू घडामोडे, कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण घुगे मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. अशिष शेलार म्हणाले
की, मराठवाड्याचा
पाण्याचा प्रश्न, जलसंधारण खात्यातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न, शेतकऱ्यांना पीककर्ज, पिकविमा, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, सारथी आणि महाज्योती या संस्थेबद्दलची
राज्य सरकारची उदासीनता, मराठवाड्यातील वाढती बेरोजगारी, मराठवाड्याचा शैक्षणिक अनुशेष अश्या असंख्य प्रश्नांना विधानसभेत आम्ही
आग्रही मांडणार असल्याचे आ. शेलार यांनी सांगितले. नावीन्यपूर्ण संकल्पना आणि
जनतेचे हित यासाठी चळवळीतील कार्यकर्ता सदैव पुढे असतो अशाप्रकारचे गौरवोद्गार
मराठवाडा पदवीधर मंच व प्रवीण घुगे यांच्या बद्दल आ.शेलार यांनी काढले .
यावेळी आपले मत व्यक्त करताना आ.
सुजितसिंह ठाकूर म्हणाले की, या कार्यक्रमामुळे मराठवाड्याचे प्रश्न ऐरणीवर येण्यास मदत होणार आहे.
कृष्णा खोऱ्यातील 23.66 टीएमसी पाणी , टाटा वीज प्रकल्पाचे पाणी नैसर्गिक न्यायाप्रमाणे मराठवाड्याला मिळाल्यास
मराठवाडा कायम दुष्काळ मुक्त होण्यासाठी मदत मिळणार आहे. मराठवाड्यातील
विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशाचा प्रश्न आम्ही आग्रहाने विधानभवनात मांडणार
असल्याचे आश्वासन आ.सुजितसिंह ठाकूर यांनी दिले.
कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी बोलताना
कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण घुगे यांनी सांगितले की, विधिमंडळ सर्वसामान्यांच्या प्रश्नाची 'वेस' बनली पाहिजे यासाठी स्वर्गीय गोपीनाथ
मुंडे आग्रही असायचे स्व. मुंडे साहेबांचा वसा पुढे चालवत मराठवाड्यातील प्रश्नांना विधिमंडळात
जोरदार वाचा फोडण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व
प्रश्नांसाठी आगामी काळात आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही प्रवीण घुगे यांनी
सांगितले.
या कार्यक्रमासाठी ऑनलाइन पद्धतीने
तज्ञ मान्यवर सहभागी झाले होते यामध्ये माजी प्राचार्य शरद अदवंत, नरहरी शिवपुरे,देविदास पाठक, पंकज भारसाकळे,अच्युत गंगणे,राम जळकोटे, परमेश्वर हसबे, शिवदास मिटकरी, प्रा दीपक देशमुख, कालिदास भांगे, अंबादास मेवणकर, अनंत सोनेकर आदी मान्यवर सहभागी होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज
शेवाळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. गजानन सानप यांनी केले आणि आभार प्रदर्शन
व्यंकटेश कमळू यांनी केले.