
जगातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व,
गोरगरीब,
वंचित,
दलित,
आदिवासी
आणि शेतकरी यांच्यासाठी देवदूताप्रमाणे कार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा
७० वा वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर दि.१४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत
संपुर्ण भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा सप्ताह म्हणून साजरा
केला जात आहे. या सप्ताहामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,
असे
आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.शाम पिंपळे यांनी शेवगाव तालुका भाजपाने आयोजित
केलेल्या मिटिंग मध्ये केले आहे.
ते पुढे म्हणाले, जिल्हाध्यक्ष
अरुण मुंडे, खा.सुजय विखे पा., आ.मोनिकाताई
राजळे, आ.बबनराव पाचपुते,
आ.शिवाजीराव
कर्डीले प्रा.भानुदास बेरड प्रदेश कार्यकारीणी सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली
हा सेवा सप्ताह वरिल कालावधीमध्ये
तालुक्यातील विविध ठिकाणी रक्तदान, गरजू
दिव्यांग यांना विविध वस्तू वाटप, कोविड
सेंटरमधील रुग्णांना फळ वाटप, विविध
ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याबरोबरच पर्यावरण संरक्षण संकल्प,
स्वच्छता
अभियान आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
यावेळी तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस प्रदेश ओबीसी सेलचे सचिव अॅड.युवराज पोटे,
किसान
मोर्चा प्रदेश सदस्य बापुसाहेब पाटेकर, उपाध्यक्ष
वाय. डी. कोल्हे, सरचिटणीस
भिमराज सागडे, किसान मोर्चाचे
जिल्हाध्यक्ष कचरु चोथे, जि.प.सदस्य
आशोक आहुजा, जेष्ठ नेते बापुसाहेब
भोसले, महिला अघाडी तालुकाध्यक्षा
गरड ताई, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष
व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.