विद्यार्थ्यांवरील लाठीमारातून आघाडी सरकारचा हुकूमशाही चेहरा दिसला : केशव उपाध्ये

Manogat
0

धुळे येथे विद्यार्थी आंदोलकांना झालेली अमानुष मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या या सरकारचा हुकूमशाही चेहराच यातून दिसला आहे, अशी प्रतिक्रिया  भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

 

श्री. उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की,  परीक्षेच्या निकालाचे पुनर्मूल्यांकन व्हावे, विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क परत करावे, अवास्तव शुल्काची मागणी करणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कारवाई करावी तसेच मार्च ते जून महिन्यातील वस्तीगृह, मेस, बस शुल्क हे शंभर टक्के परत करावे, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे एकूण  शुल्का पैकी तीस टक्के शुल्क सरसकट माफ करावे आदी मागण्यांसाठी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते शांततेने आंदोलन करत होते. या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आंदोलकांनी  पालकमंत्र्यांची भेट मागितली. विद्यार्थ्यांच्या मागण्या पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी समजून घेतल्या नाहीत. पोलिसांनीही मागण्या समजून न घेता आंदोलक विद्यार्थ्यांवर बेदम लाठीमार केला.

 

विद्यार्थी वर्गाच्या मागण्या जाणून न घेताच आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांच्या रूपातून महाआघाडी सरकारचा हुकूमशाही चेहरा या निमित्ताने समोर आला आहे , असेही श्री. उपाध्ये यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !