लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या आरोपींना जामीन देऊ नका : चित्रा वाघ

Manogat
0

लैंगिक अत्याचार , बलात्कार या सारख्या खटल्यातील आरोपींना कोरोनाच्या कारणामुळे जामीन देण्यास गृह विभागाने विरोध करावा, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी राज्याचे पोलीस महानिरीक्षक ( कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे यांना दिले आहे.


श्रीमती वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की , गेल्या तीन चार महिन्यात कोरोनाच्या कारणामुळे कैद्यांना जामीन मिळू लागला आहे. मात्र असा जामीन देताना बलात्कार , लैंगिक अत्याचारासारखे गुन्हे असलेल्या कैद्यांना जामीन मिळू नये अशी आमची मागणी आहे. असे गुन्हे दाखल असलेल्या एका कैद्याने जामीन मिळाल्यावर पीडित महिलेवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणल्याची घटना नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात नुकतीच घडली. पीडित महिलेने या दबावाला बळी पडण्यास नकार दिल्याने त्या महिलेच्या १० वर्षीय मुलीला जाळण्याचा प्रयत्न केला गेला. असे प्रकार अन्यत्रही होण्याची भीती आहे. त्यामुळे अशा आरोपींना जामीन मिळू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.

 

लैंगिक अत्याचार, बलात्कारासारख्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या कैद्यांना जामीन दिला गेला तर त्याच्यावर घातलेल्या निर्बंधांची संबंधित पोलीस ठाण्यांनी कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणीही श्रीमती वाघ यांनी केली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !