चुकीची वाढीव वीज बिले नागरिकांना पाठवणाऱ्या सरकार व महावितरण
कंपनी विरोधात ‘भाजपा’ची पदयात्रा सेल्फ सोशल डिस्टनसिंग चे पालन करून संपन्न झाली. पदयात्रेचे वाढीव विजबिलाने त्रस्त नागरिकांकडून जागोजागी
स्वागत करण्यात आले.
मीटर रिडींग प्रमाणे बिल आकारण्यात यावेत, मीटर
रिडींग घेताना ग्राहकांसमक्ष रिडींग घेण्यात यावेत, जुन्या
दरानेच बिल आकारणी करण्यात यावी, आकारण्यात आलेल्या बिलात ५० टक्के सूट देण्यात
यावी व मीटर रीडिंग न घेता देण्यात आलेली बिल रद्द करण्यात यावी, वाढीव वीज बिल
संदर्भात जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक येथील मार्ग क्रमांक १ वरील पदयात्रा सकाळी ९ वाजता सुरू होऊन पवन नगर, सावता
नगर, त्रिमूर्ती नगर मार्गे सिटी सेन्ट्रल मॉल जवळ १० वाजता विसर्जित झाली. पदयात्रा संपल्यावर भारतीय जनता पक्ष नाशिक
महानगरच्या सिटी सेंटर मॉल समोर वाढीव वीज बिलाची होळी करण्यात आली.
दुसऱ्या टप्प्यातील पदयात्रा सकाळी ११ वाजता सुरू झाली. द्वारका
काठेगल्ली सिग्नल येथुन सुरुवात - ड्रीमसिटी , शिवाजी नगर, उपनगर , नारायण
बापू नगर , जेलरोडने बिटको
विद्युत भवन येथे दुपारी २
वाजता पदयात्रा विसर्जित झाली.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापौर
सतिश कुलकर्णी, सभागृह नेते सतिष सोनवणे, गटनेते जगदीश पाटिल, उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रदिप पेशकार, मंडल
अध्यक्ष शिवाजी बरके, अविनाश पाटील, जगन
पाटील, बाळासाहेब पाटील, नगरसेविका
छाया देवांग, प्रतिभा पवार, कावेरी
घुगे, नगरसेवक मुकेश शहाणे, श्याम
बडोदे, सचिन कुलकर्णी, गोविंद घुगे, दिलीप देवांग, आबा पवार, अमित
घुगे, रवी पाटील, प्रकाश चकोर, गणेश ठाकूर, अशोक पवार, महेंद्र
पाटील, प्रशांत मेने, सोमनाथ बोडके,
प्रशांत कोतकर, प्रविण सोनवणे, साईनाथ गाडे, डॉ. सनांसे, बंडु
जाधव, कुंदन खरे, अमोल पाटील, परमानंद पाटील, शैलेश साळुंखे, विकी ठाकरे, शिवम शिंपी, जयश्रीताई
बारी, मनीषा देवरे महिला आघाडी सिडको आदी पदाधिकारी उपस्थित
होते.

