राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा पीक विमा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन : डॉ. अनिल बोंडे

Manogat
0

प्रत्येक शेतकऱ्याचा पिक विमा काढण्याचे अभियान भाजप किसान मोर्चाच्या वतीने सुरू आहे. पीक विम्याच्या मुदतीसाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ठिकठिकाणचे पक्ष कार्यकर्ते, हितचिंतक, पदाधिकारी यांनी मदत करणे आवश्यक आहे.

 

भाजप किसान मोर्चाच्या वतीने राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा पीक विमा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, भाजप कार्यकर्त्यां शिवाय समाजातील अन्य सामाजिक संस्था संघटना, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आवाहन केले आहे.

 

बळीराजाच्या कष्टाची सुरक्षितता खूप गरजेची आहे. चालू हंगामातील पीक विमा काढण्याची शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. पीक विमा प्रत्येक शेतकऱ्याला का आवश्यक आहे याची प्रचिती प्रत्येक शेतकऱ्याला गेल्या 3-4 वर्षात आलेली आहे. अवघ्या तीन चारशे रुपयाच्या विमा हाफ्त्यात साधारण दहा हजार रुपयांची भरपाई राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळाली आहे.

 

प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी लावणी - उगवण न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, काढणी पश्चात नुकसान, पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पन्नात येणारी घट याची नुकसान भरपाई यात मिळते.

 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक असून  योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास 'सहभागी न होणे बाबत घोषणापत्र' योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आगोदर कर्ज मंजूर केलेल्या बँकेत देणे आवश्यक आहे म्हणजे बँक विमा हप्ता कपात करणार नाही.

 

विभाग निहाय भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, मका, कांदा, तीळ, नाचणी, कारळे या पिकांचा विमा काढला जातो.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !