भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील
सर्व मंडल अध्यक्षांची बैठक भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. किसन कथोरे यांच्या
अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी संघटनेच्या विविध विषयांवर
चर्चा करण्यात आली. सभेत जिल्हाध्यक्ष आ. किसन कथोरे व खासदार कपिल पाटील यांनी मार्गदर्शन
केले.
आ. किसन कथोरे यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीमुळे
जिल्ह्यात सर्वत्र समाधान व आनंद व्यक्त होत आहे. यावेळी भिवंडी लोकसभा
मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील, जिल्हा सरचिटणीस
जितेंद्र डाकी तसेच मंडल अध्यक्ष उपस्थित होते.
