भारतीय जनता पार्टीच्या जालना जिल्हाध्यक्षपदी
आ.संतोष रावसाहेब पाटील दानवे यांची फेर निवड एकमताने केंद्रीय मंत्री रावसाहेब
पाटील दानवे, भाजपा निवडणूक निर्णय अधिकारी किशोर
शितोळे, मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड, आ.नारायण
कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा बैठकीत करण्यात आली.
भाजपा जालना जिल्हाध्यक्ष पदासाठी एकमेव
उमेदवारी अर्ज आ.संतोष पाटील दानवे यांचा प्राप्त झाला व त्यास जितेंद्र पालकर
यांनी सूचक म्हणून नाव सुचवले व भीमराव भुजंग व विलास नाईक यांनी अनुमोदन दिले.
नंतर निवडणूक अधिकारी किशोर शितोळे, यांनी
आ.संतोष दानवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव
पाटील दानवे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक
आण्णा पांगारकर, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर पाटील भांदरगे,
जिल्हा सरचिटणीस देविदास देशमुख, बद्रीनाथ
पठाडे, शहराध्यक्ष राजेश राऊत, बसवराज
मंगरुळे, तालुकाध्यक्ष जितेंद्र पालकर, भीमराव भुजंग, राजेंद्र देशमुख, सुरेश दिवटे, शिवाजीराव बोबडे तसेच सिद्धिविनायक
मुळे, सतीष जाधव, दीपक ठाकूर, शालिकराव म्हस्के, गोविंदराव पंडित, अवधूत खडके, तुकाराम जाधव, राजू
चव्हाण, सुभाष बोडखे, देवनाथ जाधव,
विठ्ठल चीचपुरे, चंपालाल भगत, रामलाल चव्हाण, बाबुराव खरात, विजयनाना
परिहार, बाबासाहेब कोलते, सुधाकर खरात,
अतिक खान, वसंत जगताप, अनिल
कोलते, बाबा शिंदे, संतोष लोखंडे,
कैलास गव्हाड, संजय पोकळे, मुन्ना शेखावत, मनोज शिंदे आदी उपस्थित होते.

