भाजप नेते, माजी
शिक्षणमंत्री आमदार अॅड. आशिष शेलार
संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित झालेला. देशाच्या राष्ट्रपतींची स्वाक्षरी
झालेला. राजपत्रात नोटीफिकेशन निघालेल्या कायद्याबाबत विद्यार्थ्यांना बोलता, शिकता, समजून घेऊ नका, असे
फतवे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री आणि पर्यावरण मंत्री काढत आहेत. मग आता
राज्यातील विद्यार्थ्यांना नक्षलवाद्यांचे कायदे शिकवणार का ? असा उपरोधिक सवाल भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारचं एक नव
धोरण झालं आहे की काय असं वाटतंय ? ते धोरण असं
आहे की आलं युवराजाच्या मनी... त्या युवराजाच्या मनी आलं की आघाडी सरकारचे धोरण
झालं. या राज्यातील कायदा सुव्यवस्था, नियम नियमावली आहेत.
सीएए चा कार्यक्रम कोणी करायचा आणि कोणी करायचा नाही याबाबत नियमनियमावली आहेत.
सीएएचा विरोध करणारे आझाद मैदानात एकत्र झाले त्यांना परवानगी देण्यात आली. सीएएचे
समर्थन करणारे ऑगस्ट क्रांती मैदानात एकत्र आले तर त्यांना परवानगी देण्यात आली
नाही. त्यानंतरचा आता दुसरा टप्पा सीएएचा कार्यक्रम शाळेत नाही तर शाळेच्या
प्रांगणात नाही, शाळेच्या व्यवस्थापनाने आयोजित केलेला नाही. किंवा दुसऱ्या अन्य ठिकाणीही शाळेने कार्यक्रम
केलेला नाही.
तर दुसऱ्याच ठिकाणी शाळेतील मुलं एकत्र येऊन
सीएएच्या समर्थनार्थ कार्यक्रम झाला तर मग शाळेवर कारवाई का? हा अजब न्याय कुठला ? असा सवाल करीत अॅड. आशिष शेलार यांनी युवराजांवर जोरदार टीका केली आहे.
अॅड. आशिष शेलार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या
पत्रकात म्हटले आहे की, या राज्यात शिक्षण मंत्री,
पर्यावरण मंत्री जर केंद्रीय कायदा वाचू नका, त्याचा
अभ्यास करु नका असे बंधन तरुणांवर किंवा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कसे घालू
शकतात? असे वागणे आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा घळा घोटणारे
नाही का? जर संसदेत पारित झालेला कायदा अभ्यासाचा नाही तर मग
नक्षलवाद्यांचे जंगली कायदे हे सरकार विद्यार्थ्यांना शिकवणार का? असा खडा सवाल आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.
